पत्रकारांसाठी राष्ट्रीय स्थरावर काम करणाऱ्या "इंडियन जर्नालिस्ट युनियन", नवी दिल्ली या एकमेव राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असलेल्या "जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र" या संघटनेच्या ठाणे जिल्ह्याच्या विद्यमाने शनिवार ९ ऑगस्ट २०१४ रोजी पत्रकारितेत करियर करू इच्छिणाऱ्या तसेच नवोदित पत्रकारांसाठी एकदिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या मार्गदर्शन शिबिरामध्ये बेस्टचे उप जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे व जेष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी, सोमनाथ पाटील व प्रा. हेमंत सामंत हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मुझफ्फर हुसेन, आमदार प्रताप सरनाईक, डॉ. आसिफ शेख, मिरा भाईंदर महापालिकेतील सभापती मोहन जाधव, विरोधी पक्ष नेते नरेंद्र मेहता, जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे राज्य अध्यक्ष नारायण पांचाळ, दैनिक पूर्णविरामचे संपादक यार मोहम्मद खान, रसाज टाईम्सचे संपादक रईस अहमद, नगरसेवक प्रशांत दळवी, उद्योजक विरल व्यास, निमेश शाह इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मार्गदर्शन शिबीरामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थीना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येणार असून हे शिबीर ट्रुमेन ग्रुप, शिबीर ए - २३२, शांती शॉपिंग सेंटर, पहिला माळा, मिरा रोड पूर्व याठिकाणी संपन्न होणार आहे. शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहिती साठी ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश साटम यांच्याशी ९९६७६४४९७९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मुंबई जिल्हा अध्यक्ष अजेयकुमार जाधव (९९६९१९१३६३) यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment