1 September 2015

पालिका पत्रकारांसाठी अजेंड्याच्या प्रती वाढवून दया

मुंबई महानगरपालिका पत्रकार संघाचे आयुक्तांना पत्र 
मुंबई दिनांक 1 सप्टेम्बर 2015
मुंबई महानगरपालिकेत वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना पालिका सभांचे अजेंडे मिळत नव्हते. मुंबई महानगरपालिकेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली असताना पालिका चिटणीस विभागाकडून जनसंपर्क विभागाकडे वर्षानुवर्षे २० अजेंडे पाठवले जात होते. अजेंडे मिळत नसल्याने पत्रकारांना वृत्तसंकलन करताना अडचणींना सामोरे जावे लागत होते. पत्रकारांची समस्या या आधीही "मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ" / "जर्नालिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र" (जेयुएम) (रजि) यांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांपुढे मंडळी होती. परंतू याबाबत चिटणीस विभागाकडून अजेंडे वाढवल्या शिवाय काहीही करता येवू शकत नाही असे उत्तर सातत्याने मिळत होते.

पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या "मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ" / "जर्नालिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र" (जेयुएम) (रजि) या संघटने द्वारे मुंबई महानगरपालिका आयुक्त, चिटणीस, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते तसेच जनसंपर्क अधिकारी यांना दिनांक ३१ ऑगस्ट २०१५  पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या पत्रामध्ये अजेंडाच्या ५० प्रती वाढवून मिळाव्यात,  पालिकेच्या पेपरलेस कामकाजानुसार सर्व पत्रकारांना अजेंडे ईमेलवर पाठवण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पालिका पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात मोफत सुविधा मिळण्यासाठी संघटनेचा पाठपुरावा सातत्याने सुरु असून पत्रकारांच्या सर्व समस्यांबाबत आयुक्तांची भेट घेण्यात येत आहे. 

आपल्या न्याय हक्कासाठी सतत कार्यरत असलेली संघटना
मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ 
संलग्न 
जर्नालिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र (जेयुएम) (रजि)

Displaying IMG-20150831-WA0020.jpg

No comments:

Post a Comment