दैनिक दबंग दुनियाचे संपादक श्री श्रीनारायण तिवारी यांना मंगळवारी १८ ऑगस्ट २०१५ रोजी रात्री कार्यालयात फोनवरून धमकी देण्यात आली. तिवारी यांनी याबाबत कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असली तरी पोलिसांनी या धमकीला गंभीरपणे घेतलेले नाही.
या धमकीचा जर्नालिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने निषेध नोंदवला आहे. तसे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येवून धमकी देणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत तसेच पुरोगामी महाराष्ट्रात वृत्तपत्राची गळचेपी होऊ देवू नये अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

No comments:
Post a Comment