9 January 2015

संरक्षण हवे तर पत्रकार एकजूट का होत नाहीत - नारायण पांचाळ

मुंबई / प्रतिनिधी 
पत्रकारांवर होणारे हल्ले तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याबाबत पत्रकारांमध्येच वेगवेगळे विचार ऐकायला मिळत आहेत. पत्रकार संरक्षणासारखा महत्वाचा मुद्दा ठासून मांडण्यासाठी पत्रकार एकजूट का होत नाहीत ? असा सवाल जर्नालिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्रचे राज्य अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी उपस्थित केला आहे. ते भारतीय पत्रकार संघ, मुंबई यांनी आयोजित केलेल्या कार्यशाळेतील पत्रकार संरक्षण या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


श्रमिक शिक्षण भवन, कुर्ला मुंबई येथे दोन दिवसीय पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पांचाळ यांनी उपस्थितांना पत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात माहिती दिली. पत्रकारितेत काम करणाऱ्यांनी विश्वासार्हता निर्माण होईल अशी पत्रकारिता केली पाहिजे. समाजाला योग्य दिशा देण्याचे प्रभावी माध्यम म्हणून पत्रकारितेकडे पहिले जाते. त्यामुळे चांगले असेल त्याचे स्वागत जरूर करावे मात्र अन्यायाविरोधात हल्लाबोल झालाच पाहिजे. न्या. मजिठीया आयोगाच्या शिफारशी, सुप्रीम कोर्टाचे आदेश याची अमलबजावणी महाराष्ट्रात झालेली नाही. पत्रकारांना जीवाचे किंवा आर्थिक संरक्षण याबाबत कोणतीच हमी मिळत नाही. पत्रकारांना शासकीय स्तरावर सर्व सोयी सावलती मिळायलाचं पाहिजे परंतू त्यासाठी पत्रकांची एकजूट आवश्यक आहे असे पांचाळ यांनी सांगितले. या कार्यशाळेला भारतीय पत्रकार संघ, मुंबईचे अध्यक्ष अण्णा देसाई, केंद्रीय श्रमिक बोर्डाचे संचालक प्रदीप मून, दैनिक सागरचे पत्रकार जयराम सावंत, भारतीय पत्रकार संघ, मुंबईचे महामंत्री अशोक शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment