19 January 2015

मीडियातील पत्रकारांना / कर्मचाऱ्यांना आवाहन

आपण वृत्तपत्र / वृत्तवाहिनी / वेब मिडिया मध्ये पत्रकार, छायाचित्रकार, क्यामेरामन, डीटीपी ऑपरेटर, प्रुफ रीडर किंवा इतर कर्मचारी आहात का ?. आपण वृत्तपत्र / वृत्तवाहिनी / वेब मिडिया मध्ये काम करत असाल तर आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी कामगार कायद्यानुसार युनियन म्हणून नोंद असलेली "जर्नालिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र" (जेयुएम) हि संघटना काम करत आहे. 

नुकतीच http://berakya.blogspot.in/2015/01/blog-post_14.html या लिंक वर 

"वृत्तपत्रांकडून मजिठीया आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी नाहीच" हि बातमी वाचली. यामधील आकडे पहिले तर महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाकडे कामगार कायद्यानुसार फक्त १९३ वृत्तपत्रांची  नोंद असून १०५१९ पत्रकार काम करत आहेत. कामगार कायद्यानुसार नोंद असलेल्या एकूण १९३ वृत्तपत्रांपैकी मजिठीया आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी २५ वृत्तपत्रांमध्ये पूर्ण तर १३ मध्ये अर्धवट करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ वृत्तपत्र मालकांनी आपल्या वृत्तपत्रात काम करणाऱ्या पत्रकार आणि कर्मचाऱ्यांची खरी आकडेवारी लपवली आहे. यामुळे पत्रकार आणि इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या सोयी सुविधा मिळू शकलेल्या नाहीत. पत्रकार आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क व सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी "जर्नालिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र" हि संघटना आपल्या सोबत आहे. आम्हालाही आपली साथ हवी आहे. त्यासाठी आपण "जर्नालिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र"चे सभासद होऊन पत्रकार आणि कर्मचाऱ्यांची एकता दाखवण्याची तसेच महाराष्ट्रात कार्यरत असलेले पत्रकार आणि कर्मचाऱ्यांचा खरा आकडा किती हे दाखवून देण्याची गरज आहे. 

अधिक माहिती साठी सभासद होण्यासाठी http://jumpress.blogspot.in/ या लिंकला भेट द्या   
महाराष्ट्र आणि गोवा राज्यात प्रत्तेक जिल्हा, तालुका स्तरावर युनियनचे युनिट स्थापन करावयाचे आहे. इच्छुकांनी संपर्क साधा. 

नारायण पांचाळ 
राज्य अध्यक्ष - "जर्नालिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र"
( 09420272959 / 9892120190 )

अजेयकुमार जाधव 
मुंबई अध्यक्ष - "जर्नालिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र"
9969191363
मुकेश धावडे 
सरचिटणीस 
7208181876
संपर्क प्रमुख 
मुंबई शहर - 
मुकेश धावडे ( 7208181876 )
केतन खेडेकर ( 9819896389 )
पूर्व उपनगर - 
जीवन तांबे ( 809794479 )
मुकेश धावडे ( 7208181876 )
पश्चिम उपनगरे - 
अनिल प्रताप ( 9920078123 )
पुनम पोळ ( 9870451546 ) 
ठाणे जिल्हा अध्यक्ष
सतीश साटम - 9967644979
मिरा भायंदर - अध्यक्ष 
नामदेव काशिद - 8692831106

No comments:

Post a Comment